‘सेवा रुग्णालय’ येथील उठाव शिल्पाचे (म्युरल) उदघाटन

‘सेवा रुग्णालय’ येथील उठाव शिल्पाचे (म्युरल) उदघाटन

सव्वाशे वर्षांपूर्वी कोल्हापुरातील कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयाच्या माध्यमातून सुरु झालेली वैद्यकीय सेवेची परंपरा आजही कायम आहे. रुग्नालयाच्या ऐतिहासिक जुन्या इमारतीचा पाया भरणी समारंभ दि. १६ जून, १८९७ साली राजर्षी छ. शाहू महाराज यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला होता.
१८९७ मध्ये ‘द व्हिक्टोरिया डायमंड ज्युबिली हॉस्पिटल’ या नावाने सुरू झालेले हे रुग्णालय लष्करासाठी बांधण्यात आले होते. पण, आता ‘सेवा रुग्णालय’ नावाने अद्ययावत उपकरणांच्या मदतीने गरीब रुग्णांना सेवा देण्याचा छ. शाहू महाराजांचा विचारांचा वारसा या रुग्णालयाने जपलेला आहे.
या रुग्णालयाच्या पायाभरणी यावर्षी १२५ वर्ष पूर्ण होत आहेत, या घटनेचे औचित्य साधून या समारंभाचा दुर्मिळ फोटोवरून साकारण्यात आलेल्या उठाव शिल्पाचे (म्युरल) उदघाटन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email