सीपीआर रुग्णालयातील सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक

सीपीआर रुग्णालयातील सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक

कोल्हापुर जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांच्या पार्श्वभुमीवर आज छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालय (सीपीआर) येथे भेट देऊन रुग्णालयातील सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली.
सर्वसामान्यांचा आधारवड असलेल्या सीपीआर रुग्णालयावरील विश्वासाला सार्थ ठरविण्यासाठी सर्व विभागांनी अत्यंत दक्षतापूर्वक आणि जबाबदारीने काम करावे. संकटाच्या या काळामध्ये आपण सर्वजण मिळून मन लावून काम करूया, आणि कोल्हापूरला कोरोनामुक्त करूया, असे आवाहन रुग्णालय अधिकाऱ्यांना केले.
यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रभारी अधिष्ठाता डॉ.सुधीर सरवदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुधीर सरवदे यांच्यासह डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email