सारथी संस्थेच्या कोल्हापूर उपकेंद्राचे उदघाटन

सारथी संस्थेच्या कोल्हापूर उपकेंद्राचे उदघाटन

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सारथी संस्थेच्या कोल्हापूर उपकेंद्राचे उदघाटन मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री मा. अजित पवार, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले.
खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या अथक प्रयत्नांमुळे कोल्हापूरमध्ये सारथी संस्थेच्या या उपकेंद्राचे स्वप्न साकार होत आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे. या उपकेंद्रांमुळे मराठा समाजातील होतकरू, अभ्यासू विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोठा आधार मिळणार आहे.
राजर्षी छ. शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या करवीर नगरीमध्ये सारथीचे राज्यातील पहिले उपकेंद्र सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतल्याबद्दल मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, मा. अजित पवारजी, मा. बाळासाहेब थोरातजी, मा. अशोक चव्हाणजी यांचा मी मनापासून आभारी आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने सारथीचे कोल्हापूर उपकेंद्र आजच सुरु व्हावे, अशी महाविकास आघाडी सरकारची भूमिका होती. या पार्श्वभूमीवर केवळ २४ तासांमध्ये ही इमारत या उपकेंद्रासाठी परिपूर्ण करून सोमवारपासून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे.
विद्येचे माहेरघर असणाऱ्या कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयामध्ये हे केंद्र सुरु होत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील होतकरू युवक-युवतींना सुद्धा याचा लाभ होणार आहे.
मराठा समाजाला न्याय मिळावा हीच महाविकास आघाडीची भूमिका आहे. तत्पूर्वी राज्य सरकारच्या अखत्यारीतील मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने हे महत्वाचे पहिले पाऊल आज टाकले आहे.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email