कोल्हापुरातील यळगूड येथील श्री. हनुमान सह. दूध व्याव. व कृषिपूरक सेवा संस्थेचे (यळगूड दूध संघ) संस्थापक चेअरमन सहकारमहर्षी मा. श्री. वसंतराव तात्यासाहेब मोहिते काका यांच्या ८० व्या अभिष्टचिंतन सोहळयाला उपस्थित राहून मोहिते साहेबांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
माझे वर्गमित्र सुजित मोहिते यांचे ते वडील असल्याने लहानपापासूनच त्यांच्याशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सहकाराची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या आपल्या कोल्हापुरामध्ये आजवर अनेक दिग्गजांनी सहकाराच्या माध्यमातून कोल्हापूरला पुढे घेऊन जात सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम केले आहे.
कोल्हापूर तसेच विशेषतः पश्चिम महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यामध्ये सहकार क्षेत्राचा सिंहाचा वाटा आहे. मोहिते साहेबांच्या जिद्दीमुळे आणि कडक शिस्तीमुळे यळगूड संस्था उभी राहिली आणि नावारूपाला आली.
मोहिते काकांच्या ४०-५० वर्षांच्या सहकारातील कार्यकीर्दीमध्ये त्यांनी जिल्हा दूध संघ, जिल्हा मध्यवर्ती बँक, शेतकरी संस्था अशा अनेक सहकारातील संस्थांचा पाया रचण्याचे काम केले आहे.
गोकुळ शिरगांव येथील गोकुळ दूध संघाला २८ एकर जागा मिळवून देण्यासाठी स्व. आनंदराव पाटील-चुयेकर साहेबांच्या सोबतीला मोहितेसाहेबांची मोलाची साथ लाभली. या दोघांच्या दूरदृष्टीमुळेच गोकुळ संघाचा आज वटवृक्ष झाला आहे.
एसटी बसने कोल्हापुरात आलेल्या प्रवाशाला बस मधून उतरल्यावर एसटी बस स्टॅन्ड येथील यळगूडचे सुगंधी दूध पिण्याचा मोह झाला नाही तरच नवल. मोहिते काकांचे सहकार क्षेत्रात दिलेले योगदानाचे कधीच मूल्यमापन होऊ शकत नाही. आज या कार्यक्रमाला उपस्थित राहून मोहिते काकांना शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद घेतला.
यावेळी, खा. श्रीनिवास पाटील, आ. प्रकाश आवाडे, आ. राजूबाबा आवळे, राहुल आवाडे, विश्वास पाटील, मानसिंग जगदाळे, भैय्यासाहेब जाधवराव, अजितसिंह शिंदे, सचिन सावंत, अशोकराव साळोखे, गणेश वाईंगडे, तसेच यळगूड दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक सुजितसिह मोहिते, अजितसिंह मोहिते, जेष्ठ संचालक भगवानराव पाटील, महेंद्र बेनाडीकर, सुरेश बेगडे, प्रकाश जाधव, सरपंच सौ. सुनीता हजारे, तसेच सर्व संचालक उपस्थित होते.