सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यामधील श्रमिक परराज्यात रवाना

सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यामधील श्रमिक परराज्यात रवाना

सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या राजस्थानच्या 1 हजार 477 मजुरांना घेवून श्रमिक विशेष रेल्वे राजस्थानमधील नागौरकडे आज रवाना झाली. या प्रवाशी बंधू-भगिनींसाठी खा.संजय मंडलिक यांच्या सहकार्याने ओसवाल ग्रुप कडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली. तसेच, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून सुके खाद्य पदार्थाची (चिरमुरे, फरसाण, बिस्किटे, २ पाण्याच्या बॉटल्स) व्यवस्था करण्यात आली.

यावेळी खा. प्रा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, आ. चंद्रकांत जाधव व शासकीय अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्हा काँग्रेसचे सचिव संजय पोवार – वाईकर, युवक काँग्रेसचे दिपक थोरात, एनएसयुआयचे पार्थ मुंडे, आनंदा करपे, अक्षय शेळके यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सुके खाद्यपदार्थ वाटप नियोजन केले.

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email