पाटाकडील तालीम मंडळ व डी. वाय. पाटील ग्रुप यांच्या वतीने आयोजित ‘सतेज चषक-२०२०’ या फुटबॉल स्पर्धेचा उदघाटन सोहळा आज छत्रपती शाहू स्टेडियमवर कोल्हापूरच्या फुटबॉल प्रेमींच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आज दि. १३ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत पार पडणाऱ्या या स्पर्धेत फुटबॉलमधील थरार कोल्हापूरकरांना अनुभवता येणार आहे. कोल्हापुरातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सुरु केलेल्या या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून राष्ट्रीय पातळीवर चमकलेले अनेक खेळाडू यंदाच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत.
यावेळी, महापौर सौ. निलोफर आजरेकर, जि. प. अध्यक्ष बजरंग पाटील (तात्या), आ. चंद्रकांत जाधव, आ. ऋतुराज पाटील, उपमहापौर संजय मोहिते, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संदीप कवाळे, सागर चव्हाण, माणिक मंडलिक, , जय पटकारे, सुभाष सरनाईक, निवास जाधव, आनंदा ठोंबरे, बाळासाहेब निचिते, संपत जाधव, रावसाहेब सरनाईक, दिलीप साळोखे, संजय शिंदे, बाळासाहेब चौगुले, त्रिवेंद्रम नलवडे, पराग हवालदार, संभाजी पाटील- मांगुरे, शाम देवणे, शरद माळी तसेच मोठ्या संख्येने फुटबॉल प्रेमी उपस्थित होते.परिवहन समिती सदस्य संदीप सरनाईक आणि पाटाकडील तालमीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत नेटके नियोजन केले आहे .
– ना. सतेज (बंटी) डी. पाटील