सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ विजेता

सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ विजेता

सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ विजेता

गेले तीन आठवडे छ. शाहू स्टेडियम येथे सतेज चषक फुटबॉल स्पर्धा सुरु होती. आज स्पर्धेचा अंतिम सामना पाटाकडील तालीम मंडळ (अ) विरुध्द प्रॅक्टीस फुटबॉल क्लब यांच्या सामना खेळवण्यात आला. यामध्ये पाटाकडील तालीम मंडळाने ३ – २ अशा गोलनी विजय मिळवून सतेज चषकावर आपले नाव कोरले.

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, आम. ऋतुराज पाटाल, आम. चंद्रकांत जाधव, महापौर निलोफर आजरेकर, सौ. प्रतिमा पाटील, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, अरुण नरके यांच्या प्रमुख उपस्थितील विजेत्या पाटाकडील तालीम मंडळाला २ लाख रुपये तर उपविजेता प्रॅक्टीस क्लबला १ लाख रुपये आणि चषक देण्यात आले.

तसेच, तृतीय क्रमांकाचा मानकरी फुलेवाडी संघ आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी दिलबहार तालीम मंडळाला प्रत्येकी २५ हजार रुपये बक्षिस देवून गौरवण्यात आले. उत्कृष्ठ गोल रक्षकाचा बहूमान प्रॅक्टीसचा बलवीर सिंग, उत्कृष्ठ डिफेन्सचा बहुमान पाटाकडच्या अक्षय मेथे पाटील, उत्कृष्ठ हाफचा बहुमान प्रॅक्टीसचा राहूल पाटील, व उत्कृष्ठ फॉरवर्डचा बहुमान ओंकार जाधव यांना मिळाला. या सर्वांना प्रत्येकी १५ हजार रुपये रोख बक्षिस देवून गौरवण्यात आले. या स्पर्धेतील मालिकावीराचा बहुमान पाटाकडील तालीम मंडळाच्या ऋषिकेश मेथे – पाटील यांना मिळाला. त्यांना दुचाकी गाडी बक्षिस देऊन गौरविण्यात आले.

यावेळी, उपमहापौर संजय मोहिते, शरिरसौष्ठवपटू संग्राम चौगुले, संदीप परमाळ, संपत जाधव ,विजय साळोखे, राजेंद्र ठोंबरे, सचिन चव्हाण, नगरसेवक प्रतापसिंह जाधव, डॉ. भरत कोटकर, पवनराव कव्हाणे, यशवंत सरनाई तसेच केएसएचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email