‘सतेज कृषी २०१९’ संदर्भात तपोवन मैदान येथे आयोजित पत्रकार परिषदेचे.

‘सतेज कृषी २०१९’ संदर्भात तपोवन मैदान येथे आयोजित पत्रकार परिषदेचे.

येत्या ०६ ते ०९ डिसेंबर या कालावधीत ‘सतेज कृषी २०१९’ या भव्य कृषी आणि पशु प्रदर्शनाचे आयोजन तपोवन मैदान, येथे करण्यात येणार आहे.

शेतीची उत्पादन क्षमता कशी वाढेल तसेच शेतीतील नवतंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचावे या उद्देशाने या सतेज कृषी प्रदर्शनाचे आयोजन गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही करण्यात आले आहे.

या प्रदर्शनामध्ये २०० पेक्षा जास्त कृषी कंपन्यांचा सहभाग, तीनशे पेक्षा जास्त पशु पक्षांचा सहभाग असणार आहे, फळा- फुलांचे प्रदर्शन व विक्री, विविध शेती अवजारे, बी बियाणे, खते प्रदर्शन आणि विक्री, तसेच शेतकऱ्यांसाठी ‘गटशेती’ विषयक व दुध उत्पादकांसाठी विशेष उत्पन्न वाढीचे व जोड धंद्याचे उपाय व मार्गदर्शन यांचा समावेश असणारे हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारे आहे.

चार दिवस चालणाऱ्या या सतेज कृषी प्रदर्शनात चार लाख रुपये किंमतींचा खिल्लार खोड, तीन लाख रुपयांची मुरा म्हैस, रोज तीस लिटर दूध देणारी एच. एफ. ब्रिगेड गाय, दोन फुट चार इंचाची वैशिष्टयपूर्ण गाय यासह कृषी विद्यापीठात संशोधन झालेली नवनवीन फळे आणि भाजीपाला यांचे दालनही या प्रदर्शनात असणार आहे.

यांच संदर्भात आज तपोवन मैदान येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी, आमदार ऋतुराज पाटील, उपमहापौर संजय मोहिते, शारंगधर देशमुख, रिलायन्स पॉलिमर्सचे दशरथ माने, विनोद पाटील, संदीप पाटील, शशिकांत खोत, बाबासो चौगुले, विलास साठे, श्रीपती पाटील, मधुकर रामाने, आत्मा संस्थेच्या सौ. सुनंदा कुऱ्हाडे आणि जालिंदर पांगीरे, कृषी विद्यालयाचे डॉ. अशोक पिसाळ, वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. जयवंत जगताप, जि. प. कोल्हापूरचे सह. पशुधन अधिकारी डॉ. सुनील काटकर तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

– *आमदार सतेज (बंटी) डी. पाटील*

Satej Krushi

Satej patil Kolhapur

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email