सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित ‘चला, वेली लावूया’

सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित ‘चला, वेली लावूया’

आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित ‘चला, वेली लावूया’ या स्तुत्य उपक्रमाची सुरवात करण्यात आली.
या मोहिमेची सुरवात आज कोल्हापुरातील सकाळ कार्यालयासमोर प्रातिनिधिक वेली लावून करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सर्व नियमांचे पालन करून कोल्हापुरातील विविध ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली.
‘सकाळ’ने नेहमीच विधायक गोष्टींवर भर दिला आहे. जिल्ह्याच्या एकूणच पर्यावरण व जतन संवर्धनात नेहमीच पुढाकार घेतला असून पंचगंगा, रंकाळा असेल किंवा झाडे लावूया मोहिम यशस्वी केल्या. ज्या ठिकाणी झाडे लावता येत नाहीत, अशा ठिकाणी आता वेली लावून त्यांचे जतन व संवर्धन होणार असून त्यात कोल्हापूरकर सक्रीय सहभागी होतील. प्रत्येकाने आपल्या घरात किमान दोन कुंड्यात वेली आणि एकूणच आयुष्यात किमान शंभर झाडे लावली तर नक्कीच पुढच्या पिढीला शुध्द हवा मिळेल.
यावेळी सकाळचे संपादक संचालक श्रीराम पवार, निवासी संपादक निखिल पंडितराव, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड, निसर्गमित्र संस्थेचे अनिल चौगले, प्राचार्य डॉ.महादेव नरके, वितरण व्यवस्थापक महेश डाकरे उपस्थित होते.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email