संभाव्य पूरपरिस्थितीपासून बचावाबाबत सविस्तर चर्चा

संभाव्य पूरपरिस्थितीपासून बचावाबाबत सविस्तर चर्चा

 

सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात संभाव्य पूरपरिस्थितीपासून बचावाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी आज कोल्हापूर येथे जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील जी यांच्या अध्यक्षतेखाली तिन्ही जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यासह आढावा बैठक घेतली.
धरणक्षेत्र वगळता कॅचमेंट भागात जास्त पाऊस पडतो त्यामुळे त्या पावसाचा फटका पश्चिम महाराष्ट्राला सर्वाधिक बसतो. संभाव्य पूरस्थितीचा फटका बसू नये यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांनी धरणातील उपलब्ध पाण्याचे व पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या वर्षी मर्यादित पावसाचे संकेत असले तरीसुद्धा जर अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली तरी पूर्वनियोजन करण्यात आले आहे, सोबतच, कर्नाटकातील अलमट्टी धरणातून आगामी 4 महिन्यात टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्याचे नियोजन सुरु असून पुढील काही दिवसात कर्नाटक राज्यातील जलसंपदा मंत्री आणि प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याचा विचार आहे.
या संभाव्य पूर्वपरिस्थितीबाबत प्रशासन पूर्णपणे सज्ज असून दुर्दैवाने पूर्वपरिस्थती उद्भवली तर नागरिकांमध्ये जनजागृतीचे ही नियोजन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर परिस्थितीबाबत यावेळी सर्वच लोकप्रतिनिधींनी महत्वपूर्ण सूचना मांडल्या. या दोन्ही संकटांच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि जिल्हा प्रशासन सर्व खबरदारी घेत आहे.

 

 

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email