कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील संजय घोडावत युनिव्हर्सिटी येथे सुरु असलेल्या कोविड सेंटरला भेट देऊन येथील उपाययोजनांच्या बाबत आढावा घेतला. तसेच, या कोविड केअर सेंटर मध्ये रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवा व सुविधाबाबत पाहणी केली.
सोबतच, जिल्हा प्रशासनाकडून या कोविड सेंटरसाठी बसविण्यात येणाऱ्या 6 हजार लिटरच्या लिक्विड ऑक्सिजन टॅंकच्या कामाची पाहणीही करून ऑक्सिजन टॅंक लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी, आ. राजूबाबा आवळे, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पी पाटील, पोलीस उपअधीक्षक श्रीनिवास घाडगे, प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार प्रदीप उबाळे, हातकणंगले नगरपालिकेचे नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर, गिरीश इंगवले, माजी सरपंच नूर मोहम्मद मुजावर, आरोग्य कमिटीचे गोविंद दरख, हातकणंगले पंचायत समितीचे सभापती महेश पाटील, नगरसेवक विजय खोत, जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, डॉ. उत्तम मदने, डॉ. शैलेंद्र पाटील डॉ. कोमल खेडकर, डॉ. रूपाली किनिंगे, डॉ. शोएब, डॉ. पूजा पाटील, डॉ. हर्षल शिखरे यांच्या सह संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.