संगमनेर येथील लोकोपयोगी कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन

संगमनेर येथील लोकोपयोगी कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन

आज काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या दूरदृष्टीने ज्या भागाचा सर्वांगीण विकास झालेला आहे, अशा संगमनेर येथे येऊन अनेक लोकोपयोगी कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्याची संधी मिळाली. या भागाच्या विकासाकडे आणि प्रगतीकडे पाहिले असता थोरात साहेबांनी गेल्या चार दशकं घेतलेली मेहनत लक्षात येते.
आज संगमनेर नगर परिषदेच्या 200 कोटी निधींच्या विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी, संगमनेर नगर परिषदेच्या वतीने प्रभाग क्रमांक 1 ते 14 मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
राज्यात महाविकास आघाडी सरकार हे अत्यंत चांगले काम करत असून नामदार बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे सक्षमतेने नेतृत्व करताना गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण होईल, यासाठी अविरतपणे काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष राज्यात भक्कम होत असून सततच्या विकास कामांतून संगमनेरचा झालेला परिपूर्ण विकास हा देशासाठी आदर्श ठरला आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या समाजकारणाची परंपरा नामदार बाळासाहेब थोरात यांनी जपली असून गोरगरिबांच्या जीवनात सर्वांगीण आनंद निर्माण होण्यासाठी थोरात व तांबे कुटूबियांनी आपले जीवन खर्या अर्थाने समर्पित केले आहे.
नामदार बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व सक्षम व दिशा देणारे आणि विकासाची दृष्टिकोन असलेले नेतृत्व आहे. संगमनेर तालुका हा सर्वात जास्त शेततळे असलेला राज्यातील तालुका ठरला आहे. शाश्वत विकासाचे समाजकारण करताना नामदार बाळासाहेब थोरात यांनी सर्वांना बरोबर घेतले आहे. राज्यातील अनेक ऐतिहासिक व दूरदृष्टीचे कामे करताना त्यांनी कधीही कामाचा गवगवा केला नाही मात्र, ते शाश्वत कामे करीत आले आहेत.
एक सर्वात समजदार व समन्वयकाची भूमिका पार पाडणारे ते महत्त्वाचे मंत्री आहे. राज्यातील काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्त्यांचे ते आधारवड ठरले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचे अनेक मोठमोठी कामे तालुक्यात जिल्ह्यात झाली असून या विभागाचे ते भगीरथ आहेत.
यावेळी, अध्यक्षस्थानी महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, शिक्षण मंत्री ना. वर्षाताई गायकवाड, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, डॉ. संजय मालपाणी, उपनगराध्यक्ष आरिफ देशमुख , विश्वासराव मुर्तडक , दिलीपराव पुंड , सौ शरयूताई देशमुख , इंद्रजीतभाऊ थोरात, डॉ.जयश्री थोरात, अॅड. माधवराव कानवडे, आदी उपस्थित होते.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email