शेतकरी बचाओ रॅली

शेतकरी बचाओ रॅली

केंद्र सरकार सातत्याने उद्योगपतींच्या हिताचे आणि शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. आता कृषी व कामगार कायदे आणून मोदी सरकार शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे. #CongressStandsWithKisaan
या विरोधात काँग्रेस अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आदरणीय खा. राहुल गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने देशव्यापी लढाई सुरु केली आहे.
महाराष्ट्रातही राज्याचे प्रभारी सन्माननीय एच. के. पाटील जी व प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरातजी यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. यावेळी, #शेतकरी_बचाओ_रॅली व्हर्चुअल सभेचे माध्यमातून राज्याच्या सहा वेगवेगळ्या ठिकाणांहून राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला.
राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाणजी व कृषी राज्यमंत्री ना. विश्वजीत कदम जी यांच्या समवेत कोल्हापूरहून या शेतकरी बचाओ रॅली व्हर्चुअल रॅली मध्ये सहभाग घेऊन जिल्ह्यातील तसेच राज्यातील शेतकरी बांधवांशी संवाद साधला.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email