शिवराज्याभिषेक दिन

शिवराज्याभिषेक दिन

इतिहासातील सुवर्णसोहळ्याचा साक्षीदार असलेला शिवराज्याभिषेक दिन आज कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात #शिवस्वराज्यदिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी, उत्साही, मंगलमय वातावरणात तसेच पारंपरिक वाद्यांच्या व तुतारीच्या निनादात ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या उपस्थितीमध्ये उभारण्यात आली.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मंगलमय दिवस म्हणजे ६ जून १६७४. याच दिनी छत्रपत्री शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला आणि राजे ‘छत्रपती’ झाले. या दिनाचे महत्त्व आणखी दृढ होण्यासाठी गतवर्षीपासून ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनानिमित्त संपूर्ण राज्यात आज ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ उभारण्यात येत असून ही गुढी शिव विचारांचा वारसा पुढे नेणारी गुढी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राज्य शासनाची वाटचाल सुरु असून शिव विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी शासनमार्फत यापुढेही अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

जाती धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे, रयतेचे सार्वभौम स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा.