शिवराज्याभिषेक दिन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात #शिवस्वराज्यदिन साजरा

शिवराज्याभिषेक दिन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात #शिवस्वराज्यदिन साजरा

इतिहासातील सुवर्णसोहळ्याचा साक्षीदार असलेला शिवराज्याभिषेक दिन आज कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात #शिवस्वराज्यदिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी, ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ उभारण्यात आली. याचसोबत, शिवराज्याभिषेक प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मंगलमय दिवस म्हणजे ६ जून १६७४. याच दिनी शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला आणि राजे ‘छत्रपती’ झाले. आजपासून दरवर्षी ६ जून हा दिवस #शिवस्वराज्यदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
जाती धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे, रयतेचे सार्वभौम स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email