महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी’मार्फत शिर्डी येथे आयोजित दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली. या दोन दिवसीय कार्यशाळेत उदयपूर येथे संपन्न झालेल्या चिंतन शिबिरातील घोषणापत्राची अंमलबजावणी तसेच राज्यातील राजकीय आणि सामाजिक विषय तसेच काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत मंथन करण्यात आले.
समाजातील सर्व घटकांना स्पर्श करेल अशा विविध विषयांवर या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली. १३७ वर्ष जुन्या असणाऱ्या काँग्रेस पक्षाने कायम देशहिताचा विचार केला आहे. सर्वांना सोबत घेऊन पुढे जात असताना काँग्रेस पक्षाची भविष्यकालीन रूपरेषा ठरवण्याचे काम या नवसंकल्प कार्यशाळेत झाले.
यावेळी, प्रभारी मा. एच. के. पाटील जी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जी, महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, सा.बां. मंत्री ना. अशोक चव्हाण जी, ज्येष्ठ नेते शिवराज पाटील जी, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे जी, पृथ्वीराज चव्हाण जी तसेच पक्षाचे पक्षाचे सचिव, सहप्रभारी, मंत्री, प्रदेश कार्याध्यक्ष , खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.