श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक, संकल्पक, संवर्धक, या संस्थेची विशाल ध्येय धोरणे उराशी बाळगुन सर्वसामान्य गोरगरिबांकरिता शिक्षणांची ज्ञानगंगा खेडोपाडी पोहचविणारे ध्येयवादी शिक्षक, शिक्षणातून समाजपरिवर्तनाचे कार्य करणारे एक थोर विचारवंत म्हणजे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखेजी. सर्वसामान्य मुलामुलींच्या आयुष्यात शिक्षणाची मशाल पेटविणारे शिक्षण क्षेत्रातील एक तपस्वीच.
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळूंखे यांच्या स्मरणार्थ ताराबाई पार्क हॉल मार्ग ते एस.पी. ऑफिस चौक या मार्गातील रस्त्याचे “शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळूंखे पथ” असे नामकरण करण्यात आले.
यावेळी, महापौर सौ. निलोफर आजरेकर, अभयकुमार साळूंखे सर, सौ. स्वाती यवलुजे, सौ. सरिता मोरे, नंदकुमार मोरे, अर्जुन माने, अशोक जाधव, निलेश देसाई, शुभांगी गावडे, श्रीराम साळुंखे, मुरलीधर जाधव, श्रुती जोशी, प्राचार्य आर.आर. कुंभार, युवराज भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.