‘शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील’ पुरस्कार वितरण सोहळा

‘शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील’ पुरस्कार वितरण सोहळा

शिक्षणतज्ज्ञ डी.बी.पाटील शैक्षणिक विचारमंच तर्फे शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांना देण्यात येणाऱ्या ‘शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन आज करण्यात आले होते.
यावेळी, कोल्हापुरातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांचा सन्मान महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री ना. वर्षाताई गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी, ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ साहेब, आ. जयंत आसगावकर, मा. मालोजीराजे छत्रपती, आ. राजेश पाटील, आ. राजूबाबा आवळे, आ. चंद्रकांत जाधव, विजयसिंह मोरे, बी.जी. बोराडे, आर. डी. पाटील, विजयसिह गायकवाड, एस. डी. लाड, वसंतराव देशमुख, प्रताप उर्फ भैया माने, आर. वाय. पाटील, डी. एस. घुगरे, एस. के. पाटील, व्ही. जी.पोवार, शिक्षणतज्ज्ञ डी.बी. पाटील शैक्षणिक विचारमंचाचे सर्व पदाधिकारी व जिल्ह्यातील शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email