विकासाची दृष्टी असणारे मध्यप्रदेश चे नूतन मुख्यमंत्री मा.कमलनाथजी

विकासाची दृष्टी असणारे मध्यप्रदेश चे नूतन मुख्यमंत्री मा.कमलनाथजी

विकासाची दृष्टी असणारे मध्यप्रदेश चे नूतन मुख्यमंत्री मा.कमलनाथजी

कोल्हापूर शहरासाठी थेट पाईपलाईन मंजूर झाली नाही तर परत विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असा निश्चय मी संभाजीनगर येथील सभेत 25/10/2010 रोजी केला होता.त्यासाठी नंतर सतत पाठपुरावा केला.

मला आठवते, शांतिनिकेतन स्कुल येथे माझ्या मुलीच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात असताना, सायंकाळी ७ वाजता तत्कालीन केंद्रीय मंत्री मा. कमलनाथ यांचा ” थेट पाईपलाईन” मंजुरीचा फोन आला होता. मा. कमलनाथ आणि तत्कालीन मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सहकार्यामुळे कोल्हापूरला ४२५ कोटी ४१ लाखाची “थेट पाईपलाईन” मंजूर करण्यात यश आले होते.

लोकहिताच्या कामाला पाठबळ देणाऱ्या मा. कमलनाथ यांच्यासारख्या नेतृत्वाला मध्यप्रदेश सारख्या महत्वाच्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी काँग्रेस नेतृत्वाने दिली आहे .मला खात्री आहे, मा. कमलनाथ हे नक्कीच मध्यप्रदेशला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जातील.

त्यांना पुढच्या सर्व वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email