वडणगे येथील सुभाष ग्रुप तर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त आयोजित लोकोत्सव कार्यक्रमात वडणगे गावातील मान्यवरांनी विविध क्षेत्रात केलेल्या उतुंग कामगिरी बद्दल त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.
यावेळी वडणगेचे पहिले लोकनियुक्त सरपंच सचिन चौगले यांच्या कारकिर्दीच्या वर्षपूर्तीनिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.
लहानपणापासून वडणगे गावाबद्दल विशेष लोभ आहेच .यापुढे ही गावच्या विकासासाठी मदतीसाठी तत्पर असेन, अशी ग्वाही दिली .
या समारंभामध्ये डॉ .डी. वाय. पाटील पॉलीटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके, प्रवीण चौगले, संजय पोवार, दत्तात्रय मासाळ, उपसरपंच दीपक व्हरगे,चेअरमन बाळासाहेब काटे, सुमन चौगले, जितेंद्र सावंत, पत्रकार सर्जेराव नावले, छायाचित्रकार बी.डी. चेचर, के. डी. हराळे, सौ. संपदा नांगरे यांचा सत्कार करण्यात आला.