लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व कामांची पाहणी

लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व कामांची पाहणी

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या शंभराव्या स्मृती दिनानिमित्त, शासन आणि नागरिकांच्यावतीने “लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व” १८ एप्रिल ते २२ मे २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या निमित्ताने कोल्हापूरमध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील शाहू मिलला भेट देऊन पाहणी केली. याठिकाणी सुरू असलेली साफसफाई आणि इतर कामांची त्यांनी पाहणी करत संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या.
या पाहणीनंतर यासंदर्भामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर आढावा बैठक घेतली. यावेळी, लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने आयोजित सर्व कार्यक्रमांची सविस्तर माहिती घेतली. उद्या 18 एप्रिल ते 22 मे या कालावधीत राबविण्यात येणारे उपक्रम नियोजनबद्धरित्या चांगल्या पद्धतीने राबविण्यात येणार आहेत.
या सर्व उपक्रमामध्ये, सर्व लोकप्रतिनिधी, जिल्ह्यातील सर्व संस्था, संघटना आणि नागरिकांनी उ्स्फूर्तपणे सहभागी होण्याबरोबरच लोकसहभागातून कृतज्ञता पर्व यशस्वी करण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना केल्या.
लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वाची सुरवात उद्या सोमवार दि. १८ एप्रिल रोजी सायंकाळी साडे सहा वाजता जुना राजवाडा ,भवानी मंडप येथून होणार आहे. श्रीमंत शाहू छत्रपती, सर्व लोकप्रतिनिधी, तालीम, मंडळे, विविध सामाजिक संस्था – संघटनांचे कार्यकर्ते आणि कोल्हापूरचे नागरिक यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात होणार आहे.
राजर्षी शाहू महाराज यांच्या 100 व्या स्मृतिदिनानिमित्त येत्या 6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंदासाठी, संपूर्ण जिल्ह्यात स्तब्धता पाळण्यात येणार आहे. याची माहिती पब्लिक अड्रेस सिस्टीम तसेच गाव पातळी पर्यंत देण्यात येणार आहे.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email