राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन

राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन

आज २१ ऑक्टोबर, राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन.
पोलीस कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि सर्वोच्च बलिदानाचा सन्मान करण्यासाठी तसेच शहीद पोलिसांच्या अतुलनीय शौर्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी, कर्तव्याची आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून #पोलीस_स्मृती_दिन आयोजित केला जातो.
आज मुंबई येथील पोलीस मुख्यालय येथे वीरगती प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. देशासाठी कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या पोलिसांना आणि त्यांच्या शौर्याला नमन.
याप्रसंगी मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, मा. गृहमंत्री अनिल देशमुखजी, मा. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई जी आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email