राज्यातील वाहतूक संघटनसोबत बैठक

राज्यातील वाहतूक संघटनसोबत बैठक

कोरोनाच्या संकटकाळात विविध प्रकारच्या अत्यावश्यक सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाने नियोजनबद्धरीत्या काम केलेले आहे. अत्यावश्यक सुविधा सुरळीत राहाव्यात यासाठी राज्य शासनाने सुविधा धारकांच्या मागणीनुसार 2 लाख 58 हजार 829 वाहतुकीचे पासेस २७ एप्रिल पर्यंत दिले आहेत.

संकटसमयी सुद्धा लोकांसाठी सेवा देणारे सर्व वाहन मालक, चालक व वाहकांचे मनापासून आभार.ही अत्यावश्यक सुविधा तसेच आंतरराज्य मालवाहतूक यापुढेही चांगल्या पद्धतीने सुरु राहावी यासाठी आज ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या पधाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला.

यावेळी, अध्यक्ष कुलतनसिंग अटवाल व कोअर कमिटीचे अध्यक्ष बल मलकीत सिंग यांनी खालील मुद्दे उपथित केले.
१. चालक व वाहक यांना विमा संरक्षण द्यावे.
२. राज्यभरामध्ये टोल माफ करावे.
३. चेकपोस्ट, टोल प्लाझा, पेट्रोल पंप आणि लोडिंग / अनलोडिंग पॉईंट्सवर वाहन स्वच्छता करण्यात यावी.
४.राज्य शासनातर्फे सर्व चेकपोस्ट, टोल प्लाझा, पेट्रोल पंप आणि लोडिंग / अनलोडिंग पॉईंट्सवर सॅनिटायझेशनची सुविधा उपलब्ध करावी.
५. राज्यातील वाहक व चालक यांच्या वाहतुकीसाठी पासेसची सुविधा उपलब्ध करावी.
६. ई-पासची उपलब्धता सहज होण्यासाठी यंत्रणा सक्षमपणे उभी करावी.
७.वस्तू कर / प्रवासी कर / मोटार वाहन कर याना स्थगिती मिळावी.
८. लॉकडाउन दरम्यान आकारल्या जाणाऱ्या पार्किंग शुल्कामध्ये सवलत मिळावी.
९. वाहतुकीचा माल उतरविण्यासाठी गोदामे उघडण्याची परवानगी मिळावी.
१०. वाहतूक क्षेत्रासाठी मदत निधी उपलब्ध करण्यासंदर्भात केंद्रकडे मागणी करावी.
११. राज्यातील सीमा चौक्यांवर चालक व वाहकांच्या आरोग्य तपासणी सोबत शिवभोजन सारख्या जेवणाची सुविधा करावी.

कोरोनाच्या काळात आणि नंतरही राज्यामध्ये ट्रान्सपोर्ट सुविधा सुरक्षित व जलद करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगितले.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email