राजाराम महाविद्यालयाला सदिच्छा भेट देऊन महाविद्यालयातील कामकाज आणि सुविधांबाबत आढावा बैठक

राजाराम महाविद्यालयाला सदिच्छा भेट देऊन महाविद्यालयातील कामकाज आणि सुविधांबाबत आढावा बैठक

काल राजाराम महाविद्यालयाला सदिच्छा भेट देऊन महाविद्यालयातील कामकाज आणि सुविधांबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. बाळकृष्ण ग्रंथायातील दुर्मिळ ग्रंथसंपदेची पाहणी केली.
या ग्रंथसंपदेचे जतन आणि संवर्धन करावे, अशी सूचना केली. याबाबतचा प्रस्ताव तात्काळ पाठवावा त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
या बैठकीत प्रारंभी प्रेझेंटेशनद्वारे महाविद्यालयाच्या कामकाजाविषयी सविस्तर माहिती घेतली. प्राचार्य डॉ ए.एस. खेमणार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून महाविद्यालयाला दिलेल्या निधीतून करण्यात आलेल्या भौतिक सुविधांची माहिती दिली.
राजाराम महाविद्यालय हे जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय आहे की ज्याला जिल्हा नियोजन समितीतुन निधी दिला जातो. गतवर्षी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात आलेल्या कामांची यावेळी पाहणी केली. राजर्षी शाहू सभागृह, संगणक लॅब आणि वाचनालयाची पाहणी केली. त्याचबरोबर प्राचार्य डॉ बाळकृष्ण ग्रंथालयाच्या कामाची पाहणी केली. तसेच या वर्षीची जी प्रस्तावित कामे आहेत त्याचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले असून त्यासाठीसुद्धा निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.
महाविद्यालयामधील प्राचार्य डॉ. बाळकृष्ण ग्रंथायातील दुर्मिळ ग्रंथसंपदेची पाहणी केली. ग्रंथालयात जी दुर्मिक ग्रंथसंपदा आहे. या ग्रंथसंपदेचे जतन आणि संवर्धन करावे अशी सूचना केली. त्यासाठीचा आवश्यक असलेल्या प्रस्ताव तात्काळ पाठवावा त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी, प्राचार्य डॉ ए एस खेमणार यांनी महाविद्यालयातील या ग्रंथालयात विविध भाषेतील स्वतंत्रपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील सुमारे १२ हजार दुर्मिळ ग्रंथ असल्याची माहिती दिली.
यावेळी सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड, डॉ. एल. डी. जाधव, प्रा. संजय पाठारे, प्राचार्य डॉ. महादेव नरके उपस्थित होते.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email