आज लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील दूध संघाच्या दुधभुकटी प्रकल्प व पशुखाद्य प्रयोगशाळेचा शुभारंभ तसेच वाळवा तहसील कार्यालयाचा लोकार्पण सोहळा मा. मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या समारंभासाठी ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ साहेब, गृहराज्यमंत्री सतेज (बंटी) डी. पाटील, खासदार धैर्यशील माने, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री शंभू राजे देसाई, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार मानसिंगराव नाईक आणि इतर प्रमुख पाहुणे उपस्थित होते.