आज मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्या शुभहस्ते ‘मिरा-भाईंदर,वसई-विरार’ पोलीस आयुक्तालयाचा ऑनलाईन उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
हे नवीन आयुक्तालय परिसरामध्ये कायदा सुव्यवस्था विशेषतः सागरी सुरक्षा अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.
यावेळी, यावेळी, मा. उपमुख्यमंत्री ना. अजित पवारजी, गृहमंत्री ना. अनिल देशमुखजी, ठाण्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदेजी, पालघरचे पालकमंत्री ना. दादाजी भुसेजी, गृहराज्यमंत्री ना. शंभूराजे देसाईजी, अपर मुख्य सचिव श्री. सीताराम कुंटे, पोलीस महासंचालक श्री. सु.कु.जायसवाल, या आयुक्तालयाचे पहिले आयुक्त श्री. सदानंद दाते तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.