मा. उपमुख्यमंत्री अजित पवारजी यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर आढावा

मा. उपमुख्यमंत्री अजित पवारजी यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर आढावा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मा. उपमुख्यमंत्री अजित पवारजी व आरोग्यमंत्री ना. राजेश टोपेजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसमवेत कोरोना परिस्थिती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली.
पुणे, रायगड, सातारानंतर आज मा.अजित पवारजी यांनी कोल्हापूरमध्ये कोरोनाबाबत आज आढावा बैठक घेतली. मा. उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यासोबत बैठकीचे नियोजन केले आहे.
या बैठकीमध्ये जिल्ह्यातील कोरोनासह, म्युकरमायकोसिस प्रादुर्भावाची सद्यस्थिती, प्रतिबंधात्मक उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा, लसीकरण, ऑक्सिजन उपलब्धता आदींबाबत सविस्तर माहिती दिली.
तसेच, तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये नेमण्यात आलेल्या टास्क फोर्स, मुलांसाठी तज्ज्ञ आणि ‘माझा विद्यार्थी, माझी जबाबदारी’ मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच खालील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.
१. गृहलगीकरण कमी करून संस्थात्मक विलगीकरण वाढविण्यात येणार. तसेच, ग्रामीण भागामध्ये शाळा, वसतिगृह आणि संस्थांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करणे.
२. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे फायर आणि ऑक्सिजन ऑडिट करण्यात येत असून सीपीआर रुग्णालयाचे फायर ऑडिट राज्य शासनातर्फे करण्यात येणार आहे. सोबतच जिल्ह्यातील कोरोना टेस्टिंग येत्या काळामध्ये वाढविण्यात येणार आहेत.
३. बेड मॅनेजमेंट आणि खाजगी रुग्णालयातील बिल याबाबत ऑडिट करणे.
४. आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास आणि महसूल विभागातील आवश्यक नोकरभरती करण्यात येणार.
५. कोरोनाच्या उपयोजनांबाबत जिल्ह्यातील शासनस्तरावरील प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार
६. चंदगड सारख्या दुर्गम भागामध्ये विशेष रुग्णवाहिका देण्यात येणार.
७. सफाई कामगार, कंत्राटी कामगारांचे वेतांबाबतचा प्रश्न आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये मार्गी लावण्यात येणार
८. लसीकरणाबाबत १ जुलै नंतर आवश्यक प्रमाणात लस उपलब्ध होणार असलयाने त्यानंतर लसीकरण सेंटरची संख्या वाढवून लसीकरण मोठ्याप्रमाणात करण्यात येणार
९. जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी कोल्हापूर शहराप्रमाणे १८ वर्षांवरील दिव्यांग बांधवांचे लसीकरण दर सोमवारी करण्यात येईल.
१०. म्युकरमायकोसिस आजाराचे उपचार महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत करण्यात येत आहेत, परंतु सध्या यासाठी लागणाऱ्या इंजेक्शनची कमतरता आहे परंतु, काही दिवसांमध्ये आवश्यक इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शासन व प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे, कोल्हापुरातील कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न जिल्हा प्रशासनातर्फे केले जात आहे. अजून काही दिवस प्रत्येकाने खबरदारी घेणे व नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.