‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक

कोल्हापुरातील विविध रुग्णालयातील अस्थापित करायचे आसीयू व ऑक्सीजनेटेड खाटांचे नियोजन तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.
यावेळी, गडहिंग्लज उप जिल्हा रुग्णालयाप्रमाणेच कोल्हापूर महापालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयात १०० बेडसाठीच्या क्षमतेचे ऑक्सीजन जनरेटरची सोय करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे.
भविष्यात पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढवण्याची शक्यता गृहित धरुन आरोग्य विभागाने नियोजन करण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी लवकर शोध, लवकर तपासणी आणि लवकर उपचार या त्रिसूत्रीचा वापर करून गावा गावात तपासणी शिबीर घेण्यात येणार असून या शिबिरांतर्गत स्वॅब घेण्यासाठी फिरत्या वाहनाचीसुद्धा सोय करण्यात येणार आहे. तसेच, एचआरसीटी तपासणीचा अहवालही एकत्रितरित्या आणण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे. इली, सारीच्या रुग्णांना तपासणीसाठी संदर्भित करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.
यावेळी, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी उप जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार आदी उपस्थित होते.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email