जिल्हाधिकारी कार्यालयात ऑक्सीजन उत्पादक, पुरवठादार आणि उद्योजक यांच्यासोबत बैठक

जिल्हाधिकारी कार्यालयात ऑक्सीजन उत्पादक, पुरवठादार आणि उद्योजक यांच्यासोबत बैठक

Satej Patil
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात ऑक्सीजन उत्पादक, पुरवठादार आणि उद्योजक यांच्यासोबत बैठक घेऊन खालील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यातील रुग्णालयांची ऑक्सीजनची गरज पूर्ण करण्यासाठी आणि काही प्रमाणात उद्योगांनाही पुरवठा करण्यासाठी पुणे येथून ऑक्सीजन मागवावेत. त्यासाठी दोन टँकर भाड्याने घ्यावेत त्यासंदर्भातील प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे तात्काळ पाठवावा अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
जिल्ह्यातील ऑक्सीजन उत्पादक आणि पुरवठादार यांनी वैद्यकीय कारणासाठी ऑक्सीजन सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी जिल्ह्याची एकूण मागणी पुरवण्यासाठी वाढीव उत्पादन तसेच पुरवठा वाढवावा.
या बैठकीला, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, महालक्ष्मी प्रा.लि.चे जितेंद्र गांधी, अध्यक्ष रणजित शहा, विश्वास पाटील, सचिन शिरगावकर, अमर तासगावे, कोल्हापूर गॅसचे राजेंद्र गाडवे आदी उपस्थित होते.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email