गेल्या काही दिवसांपासून पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची धामधूम चालू आहे. आज मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच जिल्ह्यातील शिक्षक व पदवीधर मतदारांनी मोठ्या उत्साहाने मतदान केले आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बूथ वर जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी, कोल्हापुरातील शिवाजी पेठ येथील सुप्रसिद्ध हॉटेल विठाई येथे महाविकास आघाडीच्या सहकाऱ्यांसोबत कोल्हापूरी मिसळीचा आस्वाद घेतला.