महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा वर्धापन दिन

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा वर्धापन दिन

आज १ जून,महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा वर्धापन दिन. १ जून १९४८ साली, परिवहन मंडळाची पहिली एसटी पुणे ते अहमदनगर या मार्गावर सुरू झाली आणि गेल्या ७३ वर्षांमध्ये महामंडळाच्या कर्मचारी-अधिकारी यांनी घेतलेल्या अविरत कष्टामुळे एसटी महाराष्ट्राची जीवनवाहिनी बनली आहे.
आज ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त मा. परिवहनमंत्री अनिल परब जी यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमामध्ये राज्यातील महामंडळाचे सर्व विभागप्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक, विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापक अशा सुमारे ३०० अधिकाऱ्यांशी व्हीसी द्वारे संवाद साधला.
दुष्काळ, महापूर किंवा कोरोना अशा कित्तेक अडचणींच्यावेळी एसटी महामंडळाने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. “गावं तिथे एसटी” संकल्पनेच्या माध्यमातून आज सुमारे १६,००० बसेस, दररोज अंदाजे ६६ लाख प्रवाशांची वाहतूक करत लालपरी प्रत्येक खेडोपाडी पोहचली.
बदलत्या काळानुसार महामंडळाने मोठ्या प्रमाणात काही बदल ही केले. त्यामुळे, निळ्या-चंदेरी रंगाची पहिली बस पासून सुरु झालेला हा प्रवास लालपरी आणि आज शिवशाही आणि विठाई पर्यंत येऊन पोहचला आहे.
महामंडळाने मालवाहतूक ही नवी सुविधा चालू केली असल्याने कोरोना काळात याचा फायदा महाराष्ट्रातील अनेक छोट्या- मोठ्या लघुउद्योगांना व व्यावसायिकांना झाला आहे. गेल्यावर्षात एसटीने ११५० मालवाहतूक वाहनांद्वारे ९५ हजार फेऱ्यांतून तब्बल ५६ कोटींचे उत्पन्न मिळवले आहे.
मला विश्वास आहे, महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयात अढळ स्थान असणारी लालपरी भविष्यातही अशीच सेवेसाठी सदैव तत्पर असेल.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email