महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिन

आज ‘महाराष्ट्र राज्य दिनी’ कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण केले. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करून महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या माझ्या सर्व कामगार बांधवांना ‘कामगार दिना’च्या शुभेच्छा देतो.
कोरोनाच्या रूपाने आपल्या महाराष्ट्रासमोर एक संकट उभे आहे. पण, महाराष्ट्र या संकटाला खंबीरपणे व संयमाने सामोरे जात आहे. या लढाईमध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकाला महाराष्ट्राचा इतिहास कायम स्मरणात ठेवेल. मला खात्री आहे, लवकरच आपण सर्वजण मिळून या संकटावर नक्कीच मात करू आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राला आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक सर्वच क्षेत्रात अव्वल करू.
आपल्याला सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र !!!

 

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email