महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचा वार्षिक अहवाल २०२०-२१ चे विमोचन

महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचा वार्षिक अहवाल २०२०-२१ चे विमोचन

आज महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचा वार्षिक अहवाल २०२०-२१ चे विमोचन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मा. ना. अजित पवारजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी, राज्यातील तलवारबाजी खेळाच्या विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
मा. अजित पवारजी यांनी २०२४ ऑलम्पिक तयारीसाठी तलवारबाजी खेळाडूंना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले असून राज्य शासनाकडून क्रीडा साहित्य योजनेत तलवारबाजी खेळाचे साहित्य मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यासोबतच, पुणे येथे तलवारबाजी खेळाची अकॅडमी सुरु करणे आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांना नियुक्ती देणे आदींवर सविस्तर चर्चा झाली.
याप्रसंगी भारतीय तलवारबाजी संघटनेचे कोशाध्यक्ष अशोक दुधारे, राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष प्रकाश कातुले, सचिव डॉ. उदय डोंगरे, कोषाध्यक्ष राजकुमार सोमवंशी व सदस्य दत्ता गलाले आदी उपस्थित होते.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email