आज महापौर निलोफर आजरेकर यांच्या प्रभाग क्रमांक २६ कॉमर्स कॉलेज प्रभागातील विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
यामध्ये, पॉलिटिक्स ग्रुप चौक ते सत्यनारायण तालीम रस्ता डांबरीकरण व हायमास्ट उदघाटन, पॉलिटिक्स ग्रुप ते रिलायन्स मॉल रास्ता डांबरीकरण, लक्ष्मीपुरी येथील वॉटर एटीएम, जय शिवराय चौक ते दत्त मंदिर रोड रस्ता डांबरीकरण, भुई गल्ली येथील रस्ता डांबरीकरण आदी कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
यावेळी, आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, उपमहापौर संजय मोहिते, शारंगधर देशमुख, जयेश कदम, हरिदास सोनावणे, विकी महाडिक, डॉ. बुलबुले, सौ. आक्काताई सोमुशे, निताताई पचिंद्रे, वर्षा मोरे, तय्यब महात, तसेच महपौर निलोफर आजरेकर, गणी आजरेकर, अशपाक आजरेकर, अश्किन आजरेकर व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.