भारताचे पहिले हिंदकेसरी पैलवान आदरणीय श्रीपती खंचनाळे (वस्ताद) श्रद्धांजली

भारताचे पहिले हिंदकेसरी पैलवान आदरणीय श्रीपती खंचनाळे (वस्ताद) श्रद्धांजली

भारताचे पहिले हिंदकेसरी पैलवान आदरणीय श्रीपती खंचनाळे (वस्ताद), पै. नामदेव पाटील आणि आज सकाळीच शाहूपुरी तालीम येथे पैलवानांचा सराव घेत असताना दुर्दैवी निधन झालेले पै. मुकुंद करजगार (वस्ताद) यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज कोल्हापुरातील मोतीबाग तालीम येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, या सर्वांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांना आदरांजली वाहिली.
कुस्तीची पंढरी असलेल्या आपल्या कोल्हापूरच्या लाल मातीत कुस्तीचे धडे गिरविण्यासाठी संपूर्ण देशातून हजारो पैलवान येतात. या पैलवानांना आपल्या अनुभवाने व कौशल्याने कुस्तीचे अनेक डाव शिकविणारे व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पैलवान तयार करणारे हे सर्व वस्ताद कोल्हापूरला लाभले. संपूर्ण आयुष्य कुस्तीसाठी वाहून घेतलेल्या या वस्तादांना भावपूर्ण आदरांजली.
यावेळी, व्ही.बी.पाटील, आ. चंद्रकांत जाधव, पै. श्री. बाळ गायकवाडजी, पै. विष्णू जोशीलकर, पै. बाबा महाडिक, पै. अमोल चौगुले, माणिक मंडलिक, अशोक पवार, किसन कल्याणकर, विजय साळोखे, सागर चव्हाण, राहुल माने, इंद्रजीत बोद्रें तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.