“ब्रँड कोल्हापूर”- वर्ष पाचवे

“ब्रँड कोल्हापूर”- वर्ष पाचवे

कला, क्रीडा, विज्ञान, उद्योग, सांस्कृतिक, संशोधन अशा विविध क्षेत्रात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केलेल्या कोल्हापूरकरांना “ब्रँड कोल्हापूर” पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. यावर्षी हा सोहळा कोल्हापूरचे सुपुत्र व निवृत्त प्रधान मुख्य वनसरंक्षक श्री. सुनील लिमये जी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल श्रीमती विजयमाला मेस्त्री यांना तसेच हॉकी खेळाच्या विकासासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल श्री. कुमार आगळगांवकर यांना ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
याप्रसंगी कला, क्रीडा, विज्ञान, उद्योग, सांस्कृतिक, संशोधन अशा विविध क्षेत्रात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर यश मिळविलेल्या 60 गौरवमूर्तींना ब्रँड कोल्हापूर पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच 6 गौरवमूर्तींचा विशेष सत्कार करण्यात आला.
सर्व गौरवमूर्तींचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!