ब्रँड कोल्हापूर मोठा करुया.

ब्रँड कोल्हापूर मोठा करुया.

ब्रँड कोल्हापूर मोठा करुया.

कोल्हापूर हा अगदी इतिहास काळापासून ब्रँड आहे. शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांपासून,शिक्षणाच्या धोरणापासून ते केशवराव भोसले, खाशाबा जाधव, लता मंगेशकर अशा नामवंतांनीआणि त्यांच्या कामाने कोल्हापूर ला कायमच सगळ्यांपेक्षा एक पाऊल पुढेच ठेवले आहे. अवधूत गुप्ते जेव्हा जिथे जिथे जे जे भरपूर ते माझे कोल्हापूर ,अस म्हणतो तेव्हा त्या पाठीमागे या साऱ्या इतिहासाचा वारसा असतो. आणि, आपली आजची पिढी सुद्धा तितकीच तोडीस तोड आहे. जगात विविध ठिकाणी आणि विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून आपले आणि रूढार्थाने गावाचे नाव मोठे करत आहे. अशा यशोशिलेदारांचे विविध संस्था या ना त्या निमित्ताने छोट्या मोठ्या प्रमाणात कौतुक सुद्धा करत असतात. पण हे यशोशिलेदार जेव्हा एखादी गोष्ट अचिव्ह करतात , तेव्हा ते प्रत्यक्षात गावाच नाव मोठं करत असतात. शेवटी एखाद्या गावाची आयडेंटिटी बनते ते कशामुळे? तर तिथल्या माणसांमुळेच!! त्यामुळे, या सर्वांचा आपल्या गावाच्या नावाने सन्मान केला पाहिजे असा विचार आला आणि त्यातून आजचा #BrandKolhapur हा उपक्रम सुरू झाला.

खरतर याची सुरवात डिजिटल प्लॅटफॉर्म वरून झाली. आपल्या कोल्हापूर च्या कोणी काही यश मिळवले की मी माझ्या फेसबुक पेज वरून त्यांचे कौतुक करत असतो . मग लक्षात आले की कोल्हापूर एवढी नर रत्नांची खाण आहे की सतत काही ना काही कर्तृत्व समोर येत असत . मग अशा सर्व कौतुकाच्या पोस्ट एकत्र व्हाव्यात, म्ह्णून त्याला काहीतरी टॅग असला पाहिजे असे वाटले आणि #BrandKolhapur हा टॅग मला सुचला. आजकाल यश फक्त मिळवून चालत नाही, तर त्याचे योग्य ब्रँडिंग करावे लागते, मार्केटिंग करावे लागते. आजचा जमाना हा प्रसिद्धीचा आहे आणि त्यात वाईट काही नाही. आणि त्यातला सर्वात मोठा मार्ग आहे तो म्हणजे डिजिटल मीडिया. आज देशात जेवढ्या प्रमाणात पायाभूत सुविधा नाहीत , त्याहून जास्त मोबाईल्स आहेत. आणि या प्रत्येकावर इंटरनेट आहे. आज सर्वाधिक लोक डिजिटल मीडिया या माध्यमावर आहेत. म्हणूनच या माध्यमावर योग्य माहिती पोहीचवणे गरजेचे आहे. हॅशटॅग ही फक्त फॅशन नाही तर तो डॉक्युमेंटेशन चा एक मार्ग आहे. जेव्हा एखादी गोष्ट गुगल वर सर्च केली जाते तेव्हा त्या टॅग च्या गोष्टी सर्च मध्ये पहिल्यांदा दिसतात आणि त्यावरूनच त्या गोष्टीबाबतचे फर्स्ट इम्प्रेशन तयार होते. म्हणूनच , आज आम्ही www.brandkolhapur.com ही वेबसाईट सुद्धा लाँच करत आहोत. जिथं सतत कोल्हापूर करांच्या विविध क्षेत्रातील आचिव्हमेंट्स च डॉक्युमेंटशन केले जाईल. कोल्हापूरच्या सर्व यशोशिलेदारांची माहिती तिथे एकत्र उपलब्ध असेल. ब्रँड कोल्हापूर च्या फेसबुक पेज आणि वेबसाईटवर नियमित पणे या गोष्टी अपडेट केल्या जातील, जेणेकरून डिजिटल विश्वात कोल्हापूरच नाव अजून मोठे होईल.

आज आपण एका कार्यक्रमात गेल्या वर्षभरात ज्यांनी आपल्या कामगिरीने गावाचे नाव मोठे केले आहे त्यांचा सत्कार सुद्धा करत आहोत. या सत्कारामागे एवढीच भावना आहे की त्यांच्या कामाची गावच्या वतीने सिम्बॉलीक का होईना, दखल घेतली जावी. शिवाय, त्यानिमित्ताने हे सर्व ब्रँड कोल्हापूर चे शिलेदार एकमेकांना भेटतील, त्यांची एकमेकांना ओळख होईल आणि संवाद वाढू लागेल.ज्याचा गावाला फायदाच होईल. यावेळेला कला, क्रीडा, विज्ञान ,उद्योग , सांस्कृतिक या विविध क्षेत्रातील ४५ कोल्हापूरकरांना गौरवण्यात येत आहे. यावर्षी हे पहिलेच वर्ष असल्याने काही नावे राहूनही जातील कदाचित, पण असा स्नेहमेळावा दर वर्षी दिवाळीत, जेव्हा जगभरातील लोक आपल्या गावी परत येतात, तेव्हा घ्यायचा ठरवले आहे, ज्यातील पुरस्कर्त्यांची निवड एका त्रयस्थ कमिटी मार्फत केली जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवलेले कोल्हापूरकर आपली माहिती या साईटवर अपलोड करण्यासाठी पाठवू शकतील. त्यांचीही दखल घेतली जाईल. एकूनचं ही एक लोकचळवळ नक्की बनेल ,असा ठाम विश्वास वाटतो . या सत्काराच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या कष्टातून कोल्हापूरचा लौकिक वाढविला , अशांप्रती कृतज्ञता, जे वैशिष्ट्यपूर्ण काम करत आहेत , त्यानाब प्रोत्साहन, व ज्यांचे काम फारसे लोकांपुढे आलेले नाही, पण जे उत्तम काम करत आहेत अशा नवेदितांना प्रोत्साहन व सुसंधी मिळावी, अशी भूमिका आहे. शिवाय, कित्येकदा आपल्या गावातल्या ग्रेट व्यकती आपल्या नजरेपुढंच येत नाहीत. परवाच मला कोल्हापूर च्याच असणाऱ्या “अरुणा देशपांडे” गेल्या तेव्हा त्यांच्याबद्दल कळले आणि आपल्या गावातील एवढी ग्रेट व्यक्ती आपल्याला माहीतच नव्हती याची खंत वाटली. असे न होता गाव आणि व्यक्ती यांचं नात घट्ट व्हावं, आकाशाला गवसणी घालताना सर्वांचीच गावाची नाळ घट्ट रहावी , हीच अपेक्षा आहे.

आणि हो, हा हॅशटॅग तुम्ही सुद्धा नक्की वापरा. आपण सगळे मिळून #BrandKolhapur मोठा करूया

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email