प्रशासकीय अधिकारी व कोल्हापुरातील रंगकर्मी यांच्यासोबत केशवराव भोसले येथे आढावा बैठक

प्रशासकीय अधिकारी व कोल्हापुरातील रंगकर्मी यांच्यासोबत केशवराव भोसले येथे आढावा बैठक

कोल्हापूरचा सामाजिक व सांस्कृतिक वारसा जपणारे ऐतिहासिक केंद्र म्हणून ओळख असणारे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहसंदर्भातील सुविधा, व्यवस्था आदी प्रश्नांबाबत आज प्रशासकीय अधिकारी व कोल्हापुरातील रंगकर्मी यांच्यासोबत केशवराव भोसले येथे आढावा बैठक घेण्यात आली.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले नाट्यगृह कोरोना प्रतिबंधक उपायोजना आणि योग्य खबरदारी घेऊन पुन्हा सुरु करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर येत्या मार्च २०२१ पर्यंत नाट्यगृहाच्या भाड्यामधे ५०% सूट देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.
तसेच, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी नाट्यकलेला आश्रय देण्यासाठी १९१५ साली उभारण्यात आलेल्या या नाट्यगृहाचे जतन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून त्यासाठी प्रशासन पातळीवर प्रयत्न करण्यात येतील. तसेच, रंगकर्मी व नाट्यप्रेमी प्रेक्षकांसाठी योग्य त्या सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी, प्रशासक कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, शारंगधर देशमुख,सचिन पाटील, संदीप नेजदार, आनंद कुलकर्णी, नाट्यकर्मी विद्यासागर अध्यापक, मिलिंद अष्टेकर, पंडित कंदले, सुनील माने, सागर बगाडे, सीमा जोशी, युवराज घोरपडे, प्रताप जमदग्नी तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email