‘पॅव्हेलियन मैदान’ येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बास्केटबॉल मैदानाचे उदघाटन

‘पॅव्हेलियन मैदान’ येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बास्केटबॉल मैदानाचे उदघाटन

कसबा बावड्यातील ‘पॅव्हेलियन मैदान’ येथे साकारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बास्केटबॉल मैदानाचे उदघाटन आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक व बास्केटबॉल खेळाडू अर्निका गुजर यांच्या शुभहस्ते व आ. ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले.
पॅव्हेलियन ग्राऊंडच्या विकासासाठी तसेच इथे कोल्हापुरातील खेळाडूंना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. याचसोबत, डीपीडीसी मधून दीड कोटी रुपये मिळणार आहेत ते मिळाल्यानंतर ग्राऊंडवरील उर्वरित राहिलेली विकास कामे सुद्धा लवकरच पूर्ण केली जाणार आहेत.
ग्राऊंडवरील सोयींमुळे येथे चांगले खेळाडू निर्माण होण्यास नक्कीच मदत होणार आहे. कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला साजेसे असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान तयार करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.