आज महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलेपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड तथा ‘महारेल’च्यावतीने ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल मा. उपमुख्यमंत्री अजित पवारजी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
पुणे व नाशिक या दोन स्मार्ट सिटीला जोडण्यासाठी २३५ किलोमीटर रेल्वे मार्गांच्या या प्रकल्पामुळे प्रवासी सेवांसह पुणे,अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यांतील पर्यटन, शिक्षण, शेती, व्यवसाय, उद्योग आदी क्षेत्रांच्या विकासाला गती मिळणार आहे.
यावेळी महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरातजी, परिवहनमंत्री ना. अनिल परबजी, कामगारमंत्री ना. दिलीप वळसे पाटीलजी, खासदार डॉ.अमोल कोल्हे, खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, आमदार अशोक पवार, आमदार चेतन तुपे, आमदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. किरण लोहमटे, आमदार सरोज आहिरे आदी लोकप्रतिनिधी तसेच ‘महारेल’चे महाव्यवस्थापक, वित्त, नियोजन, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष किंवा व्हिसीद्वारे उपस्थित होते.