नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेमध्ये आपल्या कोल्हापूरच्या चार विद्यार्थी-विद्यार्थिनीं घवघवीत यश मिळवून कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
नेर्ली गावाच्या डॉ. प्रणोती संकपाळ, राजारामपुरी येथील सौ. गौरी पुजारी-किल्लेदार, जवाहरनगर येथील कु. सौरभ व्हटकर आणि पन्हाळा तालुक्यातील किसरुळ येथील श्री. अजय कुंभार यांनी घेतलेले अपार कष्ट आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मिळविलेले हे यश कोल्हापूरवासीयांसाठी अभिमानास्पद आहे.
पालकमंत्री म्हणून आज या सर्वांचे अभिनंदन केले व या सर्वांची यशोगाथा त्यांच्याकडूनच समजावून घेतली. तसेच, त्यांच्या पुढील वाटचालीमध्ये त्यांना अनेक उच्च पदावर कार्य करण्याची संधी मिळावी व त्या संधीचे सोनं करत असताना छ. शाहू महाराजांच्या कोल्हापूरनगरीला, व परंपरेला साजेशी अशी कामगिरी त्यांच्या हातून घडो अशा शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री म्हणून या सर्वांचा सन्मान करताना खूप आनंद वाटला. यावेळी, आमदार ऋतुराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील उपस्थित होते.