पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आज राधानगरी धरणाला भेट

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आज राधानगरी धरणाला भेट

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जलधोरणांबाबतची दूरदृष्टी म्हणजे १०० वर्षांपूर्वी बांधलेले हे ‘राधानगरी धरण’. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आज राधानगरी धरणाला भेट देऊन संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी धरणातील पाणी विसर्गाबाबत माहिती घेऊन उपलब्ध जलसाठ्याची पाहणी केली.
राधानगरी धरण म्हणजे कोल्हापूरच्या हिरव्यागार शेतीचे गमक आहे. स्वयंचलित सात दरवाजे म्हणजे राधानगरी धरणाचे एक वेगळे वैशिष्ट्य बनून आहे. भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांनी या दरवाजाची रचना केली. धरण भरले की पाण्याचा दाब या दरवाजावर पडतो आणि हे दरवाजे आपोआप उघडले जातात.
तब्बल ८ टीएमसी क्षमता असलेले हे राधानगरी धरण दगडांमध्ये चुना आणि शिसे यांचे मिश्रण करुन बांधण्यात आले आहे. हे बांधकाम इतके भक्कम आहे की आज १०० वर्षानंतरही धरण भक्कमपणे उभे आहे.
सध्या धरणात २७ % पाणीसाठा शिल्लक आहे. या भागात अतिवृष्टी झाल्यावर हे धरण लवकर भरते. त्यामुळे संभाव्य पूर परिस्थितीचा धोका टाळण्यासाठी आणि पूर परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी पाटबंधारे विभागाने धरणात जूनअखेर २०% पाणीसाठा ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
धरणातील पाण्याचा विसर्ग हा योग्य नियोजन करूनच करावा. त्याचबरोबर पावसाळ्यात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राधानगरी धरणावरील सीसीटीव्ही तसेच पोलिस बंदोबस्त ठेवण्याबाबतही सूचित करण्यात आले आहे.
यावेळी आ. प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, राधानगरी तालुका काँग्रेस अध्यक्ष हिंदुराव चौगले, सदाशिवराव चरापले, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता पी. जी. माने, शाखा अभियंता विवेक सुतार, समीर निरुके, आदी उपस्थित होते.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email