पाटगांव येथील मौनी महाराज पीठ येथे श्री क्षात्रजगदगुरु पिठाच्या वर्षपूर्तीनिमित्त बोधचिन्हाचे अनावरण

पाटगांव येथील मौनी महाराज पीठ येथे श्री क्षात्रजगदगुरु पिठाच्या वर्षपूर्तीनिमित्त बोधचिन्हाचे अनावरण

कोल्हापूर जिल्हयातील भुदरगड तालुक्यातील पाटगांव येथील मौनी महाराज पीठास ऐतिहासिक महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयास जाण्यापूर्वी मौनी महाराजांचे आशिर्वाद घेतल्याची नोंद आहे.

राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी राज्यकारभार करताना अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यापैकी एक म्हणजे 1920 साली त्यांनी याच पाटगांव येथील मौनी महाराज पीठ येथे श्री क्षात्रजगदगुरु पीठाची स्थापना केली. त्यावेळी कोल्हापूरातील सदाशिवराव पाटील-बेनाडीकर या निष्णात आणि हुशार तरुणास क्षात्रजगदगुरु म्हणून नियुक्त केले. बहुजन समाजातील लोकांसाठी हा निर्णय महत्वपूर्ण होता.पाटगाव येथील या श्रीजगदगुरु पीठ निर्मितीला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.

त्यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. याबद्दल आज प्रेस कॉन्फरन्स मध्ये सविस्तर माहिती देण्यात आली. या निमित्ताने बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी संजयसिंह बेनाडीकर, महेंद्रसिंह बेनाडीकर, हर्षल बेनाडीकर अश्विनी बेनाडीकर, शिवजीत बेनाडीकर, मनजीत बेनाडीकर ,विनीत बेनाडीकर ,सुजीतसिंह मोहिते, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, डॉ. देविका पाटील आदी उपस्थित होते.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email