पाचगाव, मोरेवाडी व कळंबा या ग्रामपंचायतींसाठी सीसीटीव्ही संनियंत्रण प्रकल्पाचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा

पाचगाव, मोरेवाडी व कळंबा या ग्रामपंचायतींसाठी सीसीटीव्ही संनियंत्रण प्रकल्पाचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा

आज पाचगाव, मोरेवाडी व कळंबा या ग्रामपंचायतींसाठी पोलीस विभागाच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या सीसीटीव्ही संनियंत्रण प्रकल्पाचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

या प्रकल्पाच्या माध्यमातून पाचगाव, कळंबा आणि मोरेवाडी या तीन ग्रामपंचायतींसाठी पाचगाव येथे स्वतंत्र नियंत्रण कक्ष करण्यात आला आहे. तसेच, 147 कॅमेरे बसविण्यात आले असून या मध्ये 63 ठिकाणांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलिसांच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून एक वेगळी सुरुवात करुन सर्वांना शिस्त लावण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

यावेळी, कोल्हापूर दक्षिणचे आमदार आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पाचगावचे सरपंच संग्राम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

satej patil

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email