पन्हाळा नगरपरिषद तसेच आसपासच्या परिसरातील परिस्थितीची पाहणी

पन्हाळा नगरपरिषद तसेच आसपासच्या परिसरातील परिस्थितीची पाहणी

मंगळवार दि. ०८ सप्टेंबर रोज कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडला होता. पन्हाळा गडावर तर अवघ्या तासाभरात १४० मि.मी. इतका पाऊस पडल्याने अनेक सखल भागात पाणी शिरले होते. काही ठिकाणी रस्ता खचला असून शेतीचे व प्राणी संपत्तीचे सुद्धा नुकसान झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर, आज पन्हाळा नगरपरिषद तसेच आसपासच्या परिसरातील परिस्थितीची पाहणी करून स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्व विभागाच्या आधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी, नुकसानग्रस्त कुटुंबियांचे तातडीने पंचनामे करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. शेतीसोबतच पोल्ट्री आणि गोट्यांची पडझड, जनावरे जीवित हानी सुद्धा झाली असून या सर्वांना शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन नुकसानग्रस्त नागरीकांना दिले.

सुदैवाने पन्हाळ किल्याच्या ऐतिहासिक वास्तूला या आपत्तीमुळे कोणतीही हानी झालेली नाही. परंतु, भविष्यात अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पाऊसा पासून बचाव करण्यासाठी ऐतिहासिक पन्हाळगडासह पायथ्याशी असलेल्या गावांचा सुरक्षेच्या दृष्टीने कायमस्वरूपाचा मास्टरप्लॅन बनविण्याबाबतही चर्चा केली.

या प्रसंगी नगराध्यक्षा सौ. रुपाली रवींद्र धडेल, मुख्याधिकारी विकास खारगे, पोलीस निरीक्षक ए.डी. फडतरे, पक्षप्रतोद दिनकर भोपळे, उपनगराध्यक्ष चैतन्य भोसले, रणजित शिंदे, कार्यकारी अभियंता एस.एस. माने, कार्यकारी अभियंता एस.व्ही. काटकर, प्रांत अधिकारी अमित माळी, तहसीलदर रमेश शेंडगे, गट विकास अधिकारी तुलसीदास शिंदे, रविंद्र धडेल, प्रकाश वर्क, तय्यब मुजावर, मंदार नायकवडी, राहुल भोसले आदींसह नागरिक यावेळी उपस्थित होते.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email