पंत अमात्य बावडेकर वाडा – वारसा वैभवशाली इतिहासाचा…

पंत अमात्य बावडेकर वाडा – वारसा वैभवशाली इतिहासाचा…

पंत अमात्य बावडेकर वाडा – वारसा वैभवशाली इतिहासाचा

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यमध्ये, स्वकौशल्य आणि पराक्रमाने नावलौकिक मिळविणारे रामचंद्र पंत अमात्य यांच्या वंश परिवाराने आपल्या या वैभवशाली वारस्याला, ‘पंत अमात्य बावडेकर वाडा’ या इत्हासिक संग्रहालया द्वारे उजाळा दिला आहे.

छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, छ. राजाराम महाराज, ताराबाईपुत्र छ. शिवाजी महाराज व राजसबाईपुत्र छ. संभाजी महाराज (कोल्हापूरकर) अशा पाच छत्रपतींच्या काळात प्रधानपदी राहून राज्याची सेवा करण्याचा बहुमान रामचंद्र पंतांना मिळाला. रामचंद्र पंतांनी प्रधानपदी असतांना संताजी घोरपडे, धनाजी जाधव, शंकराजी नारायण यांच्या मदतीने मुघलांचा प्रतिकार करून गमाविलेले प्रदेश पुन्हा काबीज केले. महाराणी ताराराणी यांनी ‘मोडिले राज्य सुरक्षित ठेवले’ या चारच शब्दात छ. राज्रमण महाराजांच्या कारकिर्दीतील रामचंद्र पंतांच्या कामगिरीचे यथोचित गौरव वर्णन केले.

रामचंद्र पंतांनी लिहिलेले ‘आज्ञापत्र’ हा ग्रंथ, मध्ययुगाच्या पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडातील राजनीतीशास्त्रावरील आणि विशेषतः शिवछत्रपतींच्या राजनीतीवरील एकमेव ग्रंथ आहे.

पंत अमात्य बावडेकर वाडा इतिहासिक संग्रहालय आणि हेरीटेज होम च्या उद्घाटन प्रसंगी समस्त पंडित बावडेकर परिवारास हार्दिक शुभेच्छा!

 

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email