कोल्हापूर शहरातील दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांमुळे शहरामध्ये वाहतूक कोंडी होत आहे. यासाठी कोल्हापूर शहरातील वर्दळीच्या चौकात नवीन सिग्नलची उभारणी करण्यात आली आहे. ऐतिहासिक दसरा चौक देखील मोठ्या प्रमाणात वर्दळीचा चौक असल्याने इथे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या नवीन सिग्नलचा शुभारंभ आज करण्यात आला.
कोल्हापूर शहरातील गुन्हे रोखण्यासाठी सीसीटीव्ही आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवीन सिग्नलची उभारणीकडे प्रामुख्याने लक्ष दिले जात आहे. भविष्यातील वाढती वाहन संख्या लक्षात घेऊन कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे नवनवीन उपायोजना राबविण्यासाठी भरीव निधीची तरतूद करणार असल्याचे यावेळी सांगितले. प्रशासन रस्ते सुरक्षितेसाठी प्रयत्नशील असून नागरिकांनी सुद्धा वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे.
यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर,माजी उपमहापौर संजय मोहिते, शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी, महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, दिलीप पवार, राहुल माने, प्रताप जाधव,इंद्रजित बोंद्रे ,महेश सावंत,अर्जुन माने,प्रकाश गवंडी, संदीप कवाळे, दिग्विजय मगदूम, आदिल फरास, राहुल चव्हाण,मधुकर रामाने यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.