कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, कोल्हापूर तर्फे भारताचे माजी उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय कृषी मंत्री सन्माननीय खा. शरद पवार साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी, कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रदान केलेल्या नवीन ३९ रुग्णवाहिकांचे लोकार्पण, जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या बांधकामांचा शुभारंभ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांगांना सानुग्रह अनुदानाचे वाटप शुभारंभ देखील करण्यात आले.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील या पहिल्याच पुतळ्याच्या माध्यमातून चव्हाण साहेबांचे कार्यकर्तृत्व आणि महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या उभारणीसाठी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहणार असून संपूर्ण जिल्ह्यातील येणाऱ्या लोकप्रतिनिधींना व सर्वसामान्यांना प्रेरणा देत राहतील.
यशवंतरावजी चव्हाण साहेबांचे आणि कोल्हापूरचे नाते जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांनी मॅट्रिकनंतर ४ वर्षे महाविद्यालयीन शिक्षण राजाराम महाविद्यालयात झाले. “कोल्हापुरातील ४ वर्षे ही माझ्या आयुष्यातील पायाभूत आणि गतिमान वर्षे आहेत,” असा गौरवपूर्ण उल्लेख चव्हाण साहेबांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे.
चव्हाण साहेबांच्या निधनानंतर बळीराम पोवार, विजयसिंह पाटील, माजी कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन कोल्हापूरमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणची स्थापना केली. आज प्रतिष्ठानने प्रदान केलेल्या चव्हाण साहेबांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
यावेळी, राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाणजी, जलसंपदामंत्री ना. जयंत पाटीलजी, ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफजी, सहकारमंत्री ना. बाळासाहेब पाटीलजी, आरोग्य राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील- यड्रावकारजी, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, आ. पी.एन.पाटील, आ. प्रकाश आवाडे, आ. अरुण लाड, आ. प्रकाश आबिटकर, आ. चंद्रकांत जाधव, आ. जयंत आसगावकर, आ. राजू आवळे, आ. राजेश पाटील, भरमूअण्णा पाटील, राजीव आवळे, ए.वाय. पाटील, संजयसिंह चव्हाण, व्ही. बी. पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, तसेच सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, डॉ. सौ. पद्मराणी पाटील, सौ.स्वाती सासणे, सर्व जि.प. सदस्य व आदी मान्यवर उपस्थित होते.