नरंदे ता. हातकणंगले येथे थेट पाईपलाईन व २ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण

नरंदे ता. हातकणंगले येथे थेट पाईपलाईन व २ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण

कोल्हापूर जिल्ह्यातील नरंदे ता. हातकणंगले येथे जलजीवन मिशन अंतर्गत स्वतंत्र शुद्ध पेयजल योजना वारणा नदी ते नरंदे थेट पाईपलाईन व २ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि ७ कोटी रुपयांच्या विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्यातील गावागावांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करत असून त्यासाठी आवश्यक तो सर्व निधी राज्य शासनाकडून उपलब्द करून देण्यात येणार आहे. हे वर्ष लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मृतीशताब्धी वर्ष आहे. १९१७ साली राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाचे महत्व ओळखत प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत उपलब्ध करून समाजाला एक वेगळी दिशा दिली. राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूरमध्ये एकही मुलगा-मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी आमचे प्रामुख्याने प्रयत्न सुरु आहेत.
कोल्हापूर हे नेहमीच विकासाचे एक मॉडेल ठरले आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्यातील आम्ही सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्रित आणि एकदिलाने काम करू आणि कोल्हापूरला राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आघाडीवर घेऊन जाऊ, हा विश्वास आहे.
यावेळी, आरोग्य राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर, खा. धैर्यशील माने, माजी खा. राजू शेट्टी, राजूबाबा आवळे, सुरेश हाळवणकर सुजित मिणचेकर, अरुण इंगवले, सरपंच रवींद्र अनुसे, हिंदुराराव शेळके, अभिजित भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.