ताराबाई पार्क, कोल्हापूर येथील पितळी गणपती ते हेड पोस्ट ऑफिस रस्त्याचे ‘धन्वंतरी डॉ. वि. ह. वझे मार्ग’ असे नामकरण राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते मा.सुशीलकुमार शिंदेजी यांच्या शुभहस्ते व श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले.
यावेळी, उज्वालादेवी शिंदे, आ. चंद्रकांत जाधव, आ. ऋतुराज पाटील, आ. जयंत आसगावकर, महापौर निलोफर आजरेकर, डॉ. संजय पाटील, सौ. सरलाताई पाटील, श्रीमती वीणाताई वझे, गिरीष वझे, आनंद माने, गुलाबराव घोरपडे, शारंगधर देशमुख, संध्या घोटणे, दिलीप मोहिते, डॉ. प्रकाश गुणे, सतीश घाटगे, मोहन घाटगे, प्रसाद कामत, डॉ. प्रभू, किशोर तावडे, शिरीष सप्रे, बाबा जांभळे, रवी शिराळकर, तौफिक मुल्लाणी, स्वाती येवलुजे, माधुरी लाड, अशोक जाधव, अर्जुन माने आदी मान्यवर उपस्थित होते.